बेळगाव मध्ये येळ्ळूर गावातील सुहानी संजय हुवापणावर वय 8 ही गेल्या सहा महिन्यांपूर्वी आजाराने अंथरुणाला खिळून आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.
तसेच तिची घरची परिस्थिती देखील अत्यंत नाजूक आहे. ही गोष्ट रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल ला समजताच क्लबचे अध्यक्ष रोटरीयन रवी हतरगी आणि क्लबच्या सदस्यांच्या पुढाकारांनी सर्वांनी मिळून 26 हजार रुपये रक्कम देऊन तिच्या उपचाराकरिता मदत केली आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलनी अशा बऱ्याच गरजू लोकांना याआदी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.



