खासबाग : शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या कार्याचा गौरव करणे आवश्यक आहे. असे मत नगरसेवक रवी साळुंखे यांनी व्यक्त केले आहे.
दिवाळी निमित्त नगरसेवक साळुंखे यांनी प्रभगात स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फराळ व डबे देऊन गौरव केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गल्लीतील पंच विष्णू भाकोजी उपस्थित होते. यावेळी भाकोजी यांनी सामाजिक बांधिलकी जपत नगरसेवक साळुंखे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून चांगला उपक्रम राबविला आहे. सफाई कामगारांना पहाटेपासून काम करावे लागते.
त्यामुळे नागरिकांनी देखील कोठेही कचरा फेकू नये. असे मत व्यक्त केले.
रोहित भाकोजी यांनी सूत्र संचालन केले. यावेळी रोशन शिंदे, नितेश मेलगे, अमोल भाकोजी, गणेश गटारे, अतुल सुतार, प्रवीण भाकोजी, श्रेयस दळवी, सुरज मजगावकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.