लेडी लायन्स ग्रुप आनंदवाडी यांच्यावतीने कायदा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी लेडी लायन्स ग्रुपचा संस्थापिका समाजसेविका माधुरी जाधव पाटील, उद्घाटक म्हणून कॅम्प महिला पोलीस स्टेशनच्या पीएसआय फरीदा मुंशी या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमन चा स्टेट सेक्रेटरी प्रमोदा हजारे या होत्या. डिस्ट्रिक्ट लीगल ऑथॉरिटी सर्विसच्या वकील लता हांचीनमनी आणि वकील नसरीन पीरजादे या होत्या. यावेळी डी एल ए एस यांच्या वतीने महिलांना कायदे कानून व त्याचे सौलभ्य याची माहिती देण्यात आली. पीएसआय मुंशी मॅडम यांनी महिलांच्यावर होणारा अत्याचार त्यावर तोडगा कसा काढावा, महिलांनी स्वतःचे रक्षण करावे. महिलांसाठी महिला पोलीस स्टेशन मधील वन स्टॉप सर्विस सेंटर ची माहिती देण्यात आली. प्रमोदा हजारे यांनी महिला सबलीकरण मानव तस्करी महिला व समाज आणि तरुण वर्ग बरोबर कसे लक्ष ठेवावे आणि सायबर क्राईम बद्दल माहिती देण्यात आली. लेडी लाइन्स ग्रुप यांच्या वतीने पीएसआय फरिदा मुंशी, प्रमोदा हजारे, लता हनचीनमनी, नसरीन पिरजादे यांचा शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. लेडी लाइन्स ग्रुप मधील सर्व महिलांना जागृत केल्याबद्दल समाजसेविका माधुरी जाधव यांनी महिला पोलीस स्टेशनचे आभार मानले.



