सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रूपा गरडे यांच्या संकल्पनेतून रणरागिनी फाउंडेशन सुळगा हिंडलगा या सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे अनावरण ग्रामीण भागाचे माजी आमदार श्री संजय पाटील आणि समाजसेविका माधुरी जाधव पाटील,बीजेपी राज्य कार्यदर्शी उज्वला बडवानाचे आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री संजय पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ अनिता चौगुले यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले.
यानंतर रणरागिनी फाउंडेशन यांच्यावतीने सुळगा गावातील ग्रामपंचायत सदस्य आणि कोविड योद्धा बाळू पाटील त्याचबरोबर बजरंग दल प्रमुख, कर्नाटक स्टेट क्रिकेट चॅम्पियन कु श्रेया भोमाना पोटे, नॅशनल कराटे चॅम्पियन कुमारी नेहा राजू पोटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी रणरागिनी फाउंडेशन ला शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ लक्ष्मी नाईक या होत्या सूत्रसंचालन कुमारी कलावती कलखांबकर यांनी केले. या कार्यक्रमाकरिता फाउंडेशन मधील सर्व महिलांनी परिश्रम घेतले.