मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांसह स्वच्छता कामगारांचे मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे.त्यामुळे महापालिकेचे कामकाज आज पासून बंद असणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे व जुन्या पद्धतीने निवृत्तीवेतन देण्यात यावे अशा विविध मागण्यांकरिता सरकारी नोकर संघटनांनी आंदोलन छेडले आहे. त्यामुळे या आंदोलनाला महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला असल्याने महापालिकेचे कामकाज बेमुदत बंद असणार आहे.
आज पासून म्हणजे एक मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलनास महापालिका नोकरी विकास संघटना बेळगाव महापालिका एससी एसटी नोकर संघटना स्वच्छता कर्मचारी यासह आणि संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे.त्यामुळे आजपासून महापालिका कार्यालयातील कामकाज बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले आहे.
जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत ते पर्यंत बेमुदत कर्मचाऱ्यांचेही आंदोलन सुरूच राहणार असून त्यांना आरोग्य संजीवनी केजीआयडी जेपीएफ आदी सुविधा मिळाव्यात. तसेच जुन्या पद्धतीने पेन्शन निवृत्तीवेतन देण्यात यावे याकरिता कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडले आहे