No menu items!
Friday, August 29, 2025

शिवजंयती चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन

Must read

विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि. २७ मे रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी सहा वाजता नरगुंदकर भावे चौकातून शिवरायांच्या पालखी पूजनाने श्रीफळ वाढवून सुरु करण्यात येणार आहे.

यावेळी आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी व इतर पदाधिकायांनी केले आहे.

शिवरायांच्या चारित्र्याचे दर्शन घडवणाऱ्या शिवजयंती चित्ररथ देखावा मिरवणुकीचा साक्षात्कार समाजाला प्रेरणादायी ठरतो. मात्र या शिवचरित्र दर्शनाचा सोहळा उभा करताना शिवरायांच्या सामर्थ्याचे प्रलयकारी दर्शन जसे बेळगांव नगरीत घडते तसे अन्यत्र घडत नाही. त्यामुळे येथील शिवजयंती उत्सवाची ख्याती दूरवर पसरली आहे. बेळगावात या दिवशी जणू शिवसृष्टीच अवतरते. याची अनुभुती प्रत्येकाला येते. ही शिवसृष्टी पाहण्यासाठी बेळगावच नव्हे तर चंदगड- निप्पाणी-कोल्हापूर- गोवा आदि भागातील शिवप्रेमी शहरात डेरेदाखल होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजोमय जीवनाची कथा या उत्सवामधून युवापिढीस समजते, त्यांच्याप्रमाणेच आपले जीवन सामर्थ्यशाली बनवण्याची प्रेरणाही मिळते.

चित्ररथ देखाव्यांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन व्यसनमुक्ती, महाराजांच्या राजवटीत घडलेल्या घटनांवर आधारीत हे प्रसंग सादर केले जातात. चित्ररथासमोर लाठीमेळा, लेझीम, ढाल- तलवार, दांडपट्टा, झांजपथक अशी विविध रूपं सादर करणारे मर्दानी खेळ व दृष्य शिवप्रेमी च्या डोळ्यांची पारणे फेडणारी असतात. मिरवणुकीत आबाल-वृद्धांसहा महिलांचीही उपस्थिती लक्षणीय असते. यासाठी चित्ररथ देखावा मिरवणुकीत सहभाग घेणाना शिवजयंती मंडळांनी संयम, समन्वय, शिस्तबद्धता व शांततेने अपूर्व उत्साहात आपापल्या ठरविलेल्या विभागातून जल्लोषात चित्ररथ फिरवून लवकर मुख्य चित्ररथ देखावा मिरवणुकीत सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे .

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!