शहरातील वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून आज दुपारी श्री शनी मंदिर येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. कपलेश्वर उड्डाणपूल आणि श्री शनी मंदिर येथील पाटील गल्ली कॉर्नर येथे रहदारीचे नियोजन नसल्यामुळे आज दुपारी वाहतुकीची कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच कपिलेश्वर उड्डाणपुलावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बराच काळ वाहतूक कोंडी न सुटल्यामुळे तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या वाहन चालकांची मोठी कुचंबना होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
श्री शनी मंदिर येथे वाहतूक कोंडी, वाहन चालकांना मनस्ताप
