सोमवार दि. ५ रोजी संध्याकाळी श्री संत नामदेव मंदिर, खडे बाजार
मध्ये श्री नामदेव दैवकी संस्थेच्या वतिने समाज बांधवांची जनगणना व सभासद नोंदणी मोहीमेची सुरवात झाली.
कार्यक्रमाची सुरवात गौरवाध्यक्ष श्री नारायणराव काकडे यांच्या हस्ते श्री भगवंत विठ्ठल रूक्मिणी व
श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या पुजनाने झाली.
संस्थेचे अध्यक्ष श्री अजित कोकणे यांच्या हस्ते पहिला फॅार्म भरून सभासद नोदणीची सुरवात करण्यात आली.
आपला समाज बेळगांव शहर व परिसरात विखुरला आहे त्यांच्या पर्यंत पोहचून कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती एकत्र करून त्याची नोंद ठेऊन समाज संघटित करण्यासाठी ह्या मोहीमेची गरज असल्याचे मनोगत अध्यक्ष श्री अजित कोकणे यांनी व्यक्त केले.
सभासद नोंदणी साठी समाज बाधवांनी श्री अशोक रेळेकर, श्री दिपक खटावकर,भाऊ मुसळे, महेश खटावकर, श्री सुरेश पिसे,
श्री अमर कोपार्डे
यांच्याशी संपर्क करावा असे संचालक मंडळाच्या वतिने कळविण्यात आले आहे.
यावेळी उपाध्यक्ष श्री अशोक रेळेकर, संचालक दिपक खटावकर, सुनिल कोरडे,भाऊ मुसळे, निरंजन बोंगाळे, सुरेश पिसे, विलास खटावकर,हेमंत हावळ याच्यांसह संतोष राजगोळकर, भरत चिकोर्डे, रविकात पिसे, प्रविन कणेरी ,सुहास खटावकर, महेश खटावकर,प्रवीण महिद्रकर, प्रशांत मुसळे,सचिन पतंगे,अमर कोपार्डे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सभासद मोहिमेची सुरुवात
