जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बेळगाव बार असोसिएशन आणि वन विभागाच्यावतीने आज न्यायालय परिसरात ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एल. विजयालक्ष्मीदेवी यांनी रोपे लावून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव विभागाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण होते
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेळगावचे उप वनसंरक्षक हर्षभानू हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी स्वच्छ, प्रदूषणमुक्त वातावरण असेल तरच माणूस जगू शकेल. त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर टाळून भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणीय वारशाचे रक्षण करावे, पर्यावरण रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन रोपांची लागवड करून त्यांचे संरक्षण करावे, इंधनासह नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर टाळावा. प्लास्टिक वापरणे बंद करावे, वनविभागाच्यावतीने गेल्या ३ वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या वनीकरण व वनसंवर्धनासोबतच प्लास्टिक निर्मूलन मोहिमेत सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन हर्षभानू यांनी केले.
या कार्यक्रमास व्यावसायिक विजया शिरगुप्पी , बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी , सहाय्यक वनसंरक्षक शिवरुद्रप्प कबडगी, विभागीय वन अधिकारी पुरुषोत्तमराव जी.के., बार असोसिएशनचे सचिव गिरीश एन. पाटील, उपविभागीय अधिकारी विनय एस. गौडा आदी उपस्थित होते.