अध्यक्षपदी सागर सांगावकर तर उपाध्यक्षपदी शिवानी पाटील
सुळगा (उ.) / वार्ताहर
सुळगे (उ.) (ता. बेळगाव) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या एसडीएमसीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यामुळे नवीन एसडीएमसी कमिटी अध्यक्ष पदी सागर भरमा सांगावकर तर उपाध्यक्षपदी शिवानी जोतिबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर सदस्यपदी भावकू भ. पाटील, भरमा पं. कोवाडकर, गणपत ल. कलखांबकर, राजू य. पाटील, प्रशांत कि. तुप्पट, नारायण प. पाटील, अमृत मा. तुप्पट, ईराप्पा य. जाधव, कविता य. कणबरकर, ज्योती सं. पाटील, सोनाली म. चौगुले, रेखा जो. पाटील, सुजाता ल. यादव, शिल्पा सु. नाईक हे सदस्यपदी आहेत.
नवीन एसडीएमसी अध्यक्ष सागर भरमा सांगावकर उपाध्यक्ष शिवानी जोतिबा पाटील यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शेवटी मुख्याध्यापिका व्ही. आर. अनगोळकर यांनी सर्वांचे आभार मानले.