स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा जलतरणपटू वेदांत मिसाळे याने भुवनेश्वर (ओडीसा) येथे नुकत्याच पार पडलेल्या 39 व्या उपकनिष्ठ आणि 49 व्या कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्य स्पर्धा -2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत कांस्यपदक पटकाविले आहे.
भारतीय जलतरण महासंघाच्या मान्यतेने ओडिसा राज्य जलतरण संघटनेने गेल्या 16 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत भुवनेश्वर, ओडीसा येथे उपरोक्त उपकनिष्ठ व कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा जलतरणपटू वेदांत मिसाळ याने 100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक शर्यतीत राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक पटकाविले. वेदांत हा ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत असून तो सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात होण्याचा सराव करतो. त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर व गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन. तसेच आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डाॅ. प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर व इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त राष्ट्रीय पातळीवरील यशाबद्दल वेदांत मिसाळे याचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.



