आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने 7 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त एक सप्टेंबर 2023 पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात 1 सप्टेंबर पासून 6 सप्टेंबर पर्यंत रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांचे कृष्ण कथा कथन होईल.7 सप्टेंबर हा जन्माष्टमीचा मुख्य दिवस असून त्या दिवशी सकाळी भागवत कथा, सायंकाळी साडेपाच ते साडेसहा आणि त्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत अभिषेक, साडेनऊ ते अकरा वाजेपर्यंत नाट्यलीला, अकरा ते बारा वाजेपर्यंत पुन्हा परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराजांची कृष्ण कथा आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असा कार्यक्रम आहे.8 सप्टेंबरला प्रभुपाद अविर्भाव दिनइस्कॉन चे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिवस जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 सप्टेंबरला येत असल्याने त्याही दिवशी सकाळच्या अर्ध्या दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे
इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रम
By Akshata Naik
Must read
Previous articleमेनसे कुटुंबियांच्याकडून शेतकरी गणेशोत्सव मंडळाला देणगी
Next articleधर्मनाथ सर्कल येथे युवकाचा झाला खून



