डी. बी. पाटील अध्यक्षपदी ; उपाध्यक्ष रोहण कदम तर कार्याध्यक्षपदी आर.के.पाटील
कर्नाटक राज्यातील क्षत्रिय मराठा परिषद व बेळगाव जिल्हा क्षत्रिय मराठा परिषद तर्फे सोमवार दि. 16 आक्टोबर रोजी , डी.बी.पाटील फोटो स्टुडिओ कार्यालयात बेळगाव तालुका क्षत्रिय परिषदेची नूतन कार्यकारिणी निवड जाहिर करण्यात आली . अध्यक्षस्थानी माजी आमदार व क्षत्रिय परिषद बेळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड. अनिल बेनके होते .
यावेळी उपस्थितांचे स्वागत व संघटनेबद्दल बेळगाव क्षत्रिय परिषद जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पवार यांनी केले. जिल्हा सेक्रेटरी संजीव भोसले यांनी मार्गदर्शन केले .
‘मराठा समाजाच्या हितासाठी पक्षभेद विसरून समाजाचा विकास हाच आमचा ध्यास असून शिक्षणासाठी गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व अत्यंविधीचा मोफत खर्च यासाठी बेळगाव मध्ये मराठा भवन उभारण्यात येणार आहे अशी माहिती अॅड. अनिल बेनके यांनी दिली .
नूतन अध्यक्ष डी.बी. पाटील म्हणाले , ‘विखुरलेल्या मराठा समाजाला एकत्र करून शिक्षण व गोरगरिब , गरजूना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील राहिन असे प्रतिपादन केले .
यावेळी नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली .
अध्यक्ष – डी.बी.पाटील
उपाध्यक्ष – रोहण कदम
कार्याध्यक्ष – आर . के . पाटील
सचिव – रवी पाटील ,
– एस व्ही .जाधव
सदस्य – शिवसंत संजय मोरे
– सचिन देसाई
– टी.के. मंडोळकर
– उमेश शंकर उचगांवकर
– शामराव सुब्राव खांडेकर
– सचिन शिवाजी बिर्जे
- गणपतराव देसाई
- राहूल पवार
- गजानन शिवाजीराव बाडिवाले
- प्रताप एच. पाटील
- नवनाथ खामकर
- आण्णाप्पा पाटील
या क्रियाशिल सदस्यांची निवड जाहिर करण्यात आली व यातील काही सदस्यांना जबाबदारी दिली जाणार आहे.
शेवटी आभार प्रदर्शन आर . के .पाटील यांनी केले .