महाराष्ट्र सदन येथे आज ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात आला. या यानिमित्त ‘‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची….’….’ प्रतिज्ञा घेण्यात आली.
राज्यात दरवर्षी ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ आयोजित करण्यात येतो. यावर्षी 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा : राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा’ ही संकल्पना घेऊन केला जाणार आहे.
यातंर्गत कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना ‘भ्रष्टाचारविरूध्द लढा देण्याची…… ’ प्रतिज्ञा दिली. सोबतच ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ निमित्त राज्यपाल व मुख्यमंत्री महोदयांचे संदेशाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.