सर्वात जलद आणि तपशीलवार मिडिया अपडेस् प्रदान करण्यासाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांक ….
महाराष्ट्र परिचय केंद्राला सर्वात जलद गतीने आणि तपशीलवार मिडिया अपडेस् प्रदान करण्यासाठी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र परिचय केंद्राला आज प्रथम क्रमांकाच्या ‘प्रभासाक्षी’ पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.
देशातील आघाडीचे हिंदी न्यूज पोर्टल ‘प्रभासाक्षी’च्या सर्वात जलद गतीने आणि तपशीलवार मिडिया अपडेस् प्रदान करणा-या देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो. यावर्षी राज्यांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या 22व्या वर्धापनदिन कार्यक्रमात डॉ.अनुज गर्ग
IAAN समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व डॉ. रितु दुबे-तिवारी, प्राध्यापक, निस्कॉट मिडिया कॉलेज व प्रभासाक्षी मिडिया पोर्टलचे मुख्य संपादक श्री.निरज दुबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योतकौर अरोरा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र आहे.
’प्रभासाक्षी’ वेब पोर्टल द्वारे दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांचे माहिती देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात सर्वात जलद गतीने आणि तपशीलवार मिडिया अपडेस् प्रदान करण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत (प्रमाणित) ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय आहे.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही ट्विटर हँडलवरुन दररोज महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत.ट्विटरसोबतच कार्यालयाचे फेसबुक पेजेस(तीन),ब्लॉग,यूट्यूब चॅनेल,वॉट्सॲप ग्रुप, कु सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते. समाजमाध्यमांद्वारे अचूक,योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी घेतली आहे.
यावेळी ‘विचार संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले होते. या कार्यक्रमात वेगवेगळया विषयांवर परिसंवादाचे आयेाजन करण्यात आले होते. यामध्ये नवल किशोर दास जी महाराज, प्रख्यात धर्मगुरु साध्वी प्रज्ञा भारती, पूर्व सैन्य अधिकारी जी.डी बख्शी (सेवानिवृत), ब्रिगेडियर डी.एस त्रीपाठी, एअर वाइस मार्शल ओमप्रकाश तिवारी (सेवानिवृत्त) वरिष्ठ अधिवक्ता विष्णु शंकर जैन, वरिष्ठ अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, शेतकरी नेता राकेश टिकेत राष्ट्रीय प्रवक्ता गोपाल अग्रवाल, सुप्रिया श्रीनेत, शाजिया इल्मी तसेच डॉ.रितु दुबे-तिवारी यांनी आपले विचार मांडले.