No menu items!
Thursday, December 26, 2024

हंदिगनूर केंद्रशाळेच्या मुख्या . एन . के . शेख यांचा सदिच्छा व सत्कार समारंभ सोहळा संपन्न

Must read

हंदिगनूर येथे केंद्र मुख्या . एन . के . शेख यांचा सदिच्छा व सत्कार समारंभ दिनांक 31-10-23 रोजी उत्साहाने व मोठ्या संख्येने पार पडला . कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्लाप्पा लक्ष्मण कडोलकर , प्रमुख पाहुणे KPCC चे सदस्य मलगौडा पाटील व माजी जिल्हा पंचायत सदस्य अरुण कटांबळे उपस्थित होते .

सुत्रसंचालन एम . एम . नांगरे यांनी केले . पाहुण्यांची ओळख एस.व्ही . कुंभार यांनी केली . प्रास्ताविक आर. एन . किल्लेकर यांनी केले . व आभार बजंत्री यांनी मानले .
30 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत शेख मॅडमनी केलेल्या उत्कृष्ट कार्यांचा उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले . व त्यांना सर्वांनी पुढील जीवनासाठी आरोग्यमय व सुखमय राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या .
सत्कारमूर्ती शेख मॅडमनी हंदिगनूर शाळेला एक डिजिटल रूम करून दिली व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले .
कार्यक्रमाला हंदीगनूर ग्रामस्थ , आजीमाजी शाळा व्यवस्थापन कामटीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य – सदस्या , आजी माजी विद्यार्थी , हंदिगनूर क्लस्टरचे सिआरपी बाळगट्टी व सर्व मुख्याध्यापक , कंग्राळी KH क्लस्टरचे सीआरपी पाटील , माजी CRP प्रकाश बेळगुंदकर , मार्कंडेय हायस्कुलच्या मुख्या . नीला चौगुले , कंग्राळी KH व मण्णुरचे माजी विद्यार्थी , MHPS मण्णुर शिक्षकवृंद , MHPS जाफरवाडी शाळेचे शिक्षकवृंद , मुख्या . वSDMC , MHPS कडोली चे शिक्षकवृंद , हंदिगनूर ग्रामपंचायत सदस्या अॅडव्होकेट कु . माधुरी कल्लाप्पा पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य एम . के . पाटील , माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष भैरनाय महादेव पाटील , पी . के . पिएस चे चेअरमन दयानंद पाटील , सरस्वती हायस्कुलचे उपाध्यक्ष पी. जी . पाटील , तसेच मुख्याध्यापक जे . एस. पाटील उपस्थित होते .

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!