बेळगाव – बेळगाव सह सीमा भागातील 865 गावे महाराष्ट्र समावेश करण्यात यावीत या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे एक नोव्हेंबर रोजी काळा दिनानिमित्त निषेध फेरी काढण्यासाठी होती. यादरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कन्नड भाषकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यां विरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, सरिता पाटील, रणजीत चव्हाण पाटील, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातखांडे,गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, एम.जे.पाटील, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, सरस्वती पाटील, विकास कलघटगी आदींचा यामध्ये समावेश आहे.
बेकायदा जमाव जमवणे दोन भाषेतील निर्माण करणे आधी कलमाखाली मराठी नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मवीर संभाजी उद्यान इथून सायकल फेरीला सुरुवात झाली होती सायकलफेरी भाग घेतलेल्या नेते कार्यकर्त्यांना लक्ष बनवून आले आहेत