बेळगाव : जिल्हा प्रशासन, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, जि. पं., शिक्षण खाते, महिला आणि बालकल्याण खाते, कामगार आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १२ रोजी सकाळी ११ वा. जागतिक बाल कामगार विरोधी दिन साजरा केला जाणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदिरमध्ये जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सदस्य मुरलीमोहन रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी नितेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त यड़ा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, मनपा आयुक्त पी. एन. लोकेश, समाज कल्याण खात्याचे नवीन शिंत्रे, कामगार खात्याचे नागेश डी. जी., मागासवर्गीय खात्याचे शिवप्रिया कडेचोर, प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, शिक्षण खात्याचे उपनिर्देशक मोहनकुमार हंचाटे, महिला व बालकल्याण खात्याचे सहसंचालक नागराज आर. उपस्थित राहणार आहेत
प्रशासनातर्फे उद्या बाल कामगार विरोधी दिन
By Akshata Naik
Previous articleसंभाव्य धोका ओळखून बळ्ळारी नाल्याच तोंड खुल कराव
Next articleबसवण कुडचीत गणेशोत्सव मंडळांचे पाठ पूजन उत्साहात