पाऊस सुरु झाला की गणेशोत्सवाची चाहूल लागते. त्या अनुषंगाने बसवण कुडची येथील मंडळानी पाठ पूजन करून ते मूर्ती शाळेत देण्यास सुरुवात केली आहे.पावसाळ्याला सुरुवात झाली की श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या मंडळाची श्री गणपती मूर्ती निवडायला व मूर्ती शाळेत तयार करायला द्यायला गडबड करत असतात. त्या अनुषंगाने शहर व ग्रामीण भागातील सर्व मंडळे श्रीमूर्तीच्या पाठाचे पूजन करून पाठ मूर्ती शाळेत देण्यासाठी लगबग करू लागले आहेत. शनिवारी गांधी गल्ली, बसवण कुडची येथील श्री सार्वजनिक युवक मंडळ, जय युवक मंडळ या मंडळाने पाठ पूजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर दिवटे होते. यावेळी मल्लाप्पा जोडगुंडे व उपाध्यक्ष आनंद परीट पाठाचे पूजन करण्यात आले. तसेच लक्ष्मण नीलजकर व सचिन नीलजकर यांच्या हस्ते मूर्तिकार भरमा लोहार यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी यल्लाप्पा भडाचे, मानाजी चौगुले, अशोक जोडगुंडे, नीलजकर, सुनील नीलजकर, निखिल दिवटे, अक्षय दिवटे, लखन चौगुले, बजरंग बेडका, सुभाष कलेकणावर व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसवण कुडचीत गणेशोत्सव मंडळांचे पाठ पूजन उत्साहात
By Akshata Naik
Previous articleप्रशासनातर्फे उद्या बाल कामगार विरोधी दिन