बेळगाव : राणी चन्नम्मा
विद्यापीठाच्यावतीने दि. २९ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या पदवी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लवकरच परीक्षेसाठीची पुढची तारीख कळविण्यात येणार आहे.
मूल्यमापन विभागाच्या कुलसचिवांनी यासंबंधी एक परिपत्रक जारी केले असून २९ सप्टेंबर रोजी स्पर्धा परीक्षा होणार आहेत. त्यामुळे बीए चार व सहाव्या सेमिस्टरसाठी त्याच दिवशी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
बीएच्या सहाव्या सेमिस्टरसाठी वुमन राईट्स एज्युकेशन तर चौथ्या सेमिस्टरसाठी संशोधन व विमर्ष या विषयावरील परीक्षा होणार होती. त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.