ईशान्येतील राज्याला क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या बेळगाव येथील एका क्रीडा शिक्षकाला मणिपूरमध्ये अटक झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्पर्धेसाठी गेलेल्या विद्यार्थिनींचा छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केल्याचे समजते.या घटनेने एकच खळबळ माजली आहे. क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थिनींना घेऊन बेळगाव येथून दोन शिक्षक इम्फाळला गेले होते. विद्यार्थिनींशी लगट करण्याचा एकाने प्रयत्नकेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून संबंधित विद्यार्थिनींनी धाडसाने स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इम्फाळमध्ये घडलेल्या या घटनेसंबंधी शिक्षण खात्याने कसलीच माहिती दिली नाही. मणिपूर प्रशासनाच्या मदतीने त्या विद्यार्थिनींनी बेळगाव गाठले असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्पर्धेसाठी गेलेल्या विद्यार्थिनींसमवेत दोन प्रशिक्षकही गेले होते. त्यापैकी एकाला अटक झाली आहे. दुसऱ्या प्रशिक्षकाने बेळगाव गाठल्याची माहिती मिळाली आहे.
विद्यार्थिनींशी लगट केल्याचा आरोप-क्रीडा शिक्षकाला अटक
By Akshata Naik
Must read
Previous articleबेळगावात दरोडेखोरांनी केली महिलेची हत्या
Next articleमुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला अटक