बेळगाव: मैनाबाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा चौगुले यांनी भारत-पाकिस्तान युद्धात ऑपरेशन सिंदूरच्या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने देशभक्तीचा उद्घोष करत भारतीय सैन्याची प्रशंसा केली आहे. आपल्या थार गाडीवर सिंदूर ऑपरेशनचे पोस्टर लावून त्यांनी “आम्ही सैन्यासोबत आहे” या संदेशासह पाकिस्तानविरोधी भावना व्यक्त केली.
चौगुले यांनी म्हटले, “ऑपरेशन सिंदूर हे केवळ युद्धातील विजय नसून, भारतीय सैन्याच्या सामर्थ्य आणि संकटकाळात देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या तत्परतेचे प्रतीक आहे. या सैनिकांवर आम्हाला अभिमान वाटतो.” त्यांनी बेळगाव जिल्ह्यातील सुनबाई सोफिया कुरेशी यांच्या देशसेवेचा उल्लेख करून, “देशप्रेम आणि कर्तव्यभावना हाच खरा पाया आहे” असे त्यांनी सांगितले .