गरजूंना ‘अन्नदान’ आणि ‘पशुखाद्याचे’ वितरण
कै. रोहन नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त पशुखाद्याचे वितरण व गरजूंना अन्नदान
दिवंगत रोहन नाईक यांचा वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी (दि. १४) मे रोजी शहरातील एका गोशाळेला भेट देऊन पशुखाद्याचे वितरण तसेच गरजूंना पुलाव वाटप (अन्नदान) केले.
कै. रोहन नाईक यांचे गतवर्षी निधन झाले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्वजण पैसा खर्च करतात. मात्र दिवंगत मित्राच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याच्या वाढदिनी पशुखाद्याचे वितरण आणि गरजूंना अन्नदान करून त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माण केलेला आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे.
यावेळी अँथोनी, कपिल, आकाश, अक्षय, गणेश, पप्पू, सुजल, सुमेघ, निखिल सागर आदि सहकारी उपस्थित होते.