सध्या लग्नाचा सीझन जोरदार सुरू असून लग्नाचे मुहूर्त अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे लगीनघाई लागली आहे तसेच आजकल चा जमान्यात उपवर मुली किंवा मुलीचे आईवडील ज्या प्रामाणे शेतकरी नवरा म्हटल्यावर नाकं मुरडत एकद्या सरकारी नोकरीत असलेला मुलगा आपला सहजीवनाचा साथीदार किंवा जावई म्हणून मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात आणी तशा प्रकारची सोयरिक जळवली जाते आणि मग लग्नचा बार ही अगदी तशाच पद्धतीने उडवून दिला जातो त्यामध्ये प्रामुख्याने वरात ही आलिशान गाडी किंवा रथ किंवा घोड्यावरुण नवरदेव मंडपात दाखल होणं ही फॅशनच आहे .पण बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी या गावातील एका रमेश चंद्रकांत आलगोंडी या नवरदेवाने चक्क शेतकऱ्यांचे पारंपारीक वाहन म्हणजे बैलगाडी या बैलगाडा शर्यतचा गाड्या वरून दाखल होत शेतकरी मुलगा नवरा म्हणून नकारु नका आसा जणू संदेशच दिला आणी या सामाजिक संदेशमुळे उपस्थित पाहुणे मंडळी खरोखरच पाहुन भारावून गेली
ना डाॅल्बी ना धांगडधिंगा नसताना विवाह सोहळाचा आनंद द्विगुणित करता येतो हे बैलगाडीतून दाखल होत दाखवून देत शेतकऱ्यां विषयी आदर व्यक्त करण्याचे उत्तम उदाहरण दिले .