बेळगाव महापालिकेत बांधकाम स्थायी समिती बैठक पार पडली .यावेळी महापौर मंगेश पवार यांच्यासमोर नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बैठकीत उभे राहायला सांगून जाब विचारण्यात आला. प्रभागात पथदीपांची दुरुस्ती, कूपनलिकेची दुरुस्ती किंवा इतरकोणतेही काम होत असेल तर त्याची माहिती आम्हाला द्यावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
महापालिकेकडून आपल्या प्रभागात एखादे काम सुरु असेल तर ते परस्पर केले जात आहे. त्यामुळे, त्या कामाबाबत आपल्याला माहिती मिळत नाहीत. त्याठिकाणी कोणतीसमस्या आहे, याबाबत अधिक माहिती देता येत नाही. प्रभागात काम सुरु असताना संबंधित नगरसेवकांना विश्वासात घेण्यात यावे, असे वारंवार सांगण्यात आले आहे. पण, त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला.
बेळगाव महापालिकेत बांधकाम स्थायी समिती बैठक
