मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाप्रमाणे एक जून 1986 च्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम हिंडलगा येथे होणार आहे .या श्रद्धांजली कार्यक्रमास सीमा भागातील मराठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि हुतात्म्यांना अभिवादन करावे असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात रविवार दिनांक 1जून2025रोजीसकाळी ठीक साडेआठ वाजता सर्वांनी उपस्थित राहावे.