शहरातील तिसरे रेल्वे गेट येत्या काही दिवसांकरिता बंद राहणार आहे. 12 मार्च ते 14 मार्च पर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सहा पर्यंत सदर रेल्वे फाटक बंद असणार असून वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे रेल्वे खात्याकडून कळविण्यात आले आहे.
शहरात रेल्वेमार्गाच्या दुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .त्यामुळे काही काळासाठी रेल्वे फाटक बंद करून कामे पूर्ण करण्यात येत आहे. तर आता तिसऱ्या रेल्वे गेट येथे देखील दुपदरी करणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असून तिसरे रेल्वे फाटक तीन दिवस बंद असणार आहे.