No menu items!
Friday, November 22, 2024

16 मार्च रोजी ही होणार लिलाव प्रक्रिया

Must read

बेळगाव जिल्हा परिषदांकडून (बीडीसीसी) 16 मार्च 202 रोजी रामदुर्ग येथील कर्जबाजारी श्री शिवसागर शुगर्सच्या
मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. सदर लिलाव प्रक्रिया कारखानाच्या आवारातच होणार आहे.श्री शिव सागर शुगर्स हा गेल्या ५ वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना नुकताच यावर्षी पुन्हा सुरु झाला होता.

बीडीसीसीचे चेअरमन रमेश कत्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारखान्यावर बीडीसीसी बँक आणि डीसीसी बँक विजयापुरा यांच्याकडून 102.47 कोटी रुपये कर्जाचा बोजा घेतला आहे.या दोन्ही बँकांनी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाला नोटीस पाठवून देखील त्यांच्याकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले नाही.

त्यामुळे कर्ज वसुलीसाठी बँकांना कारखाना मालमत्तेचा लिलाव प्रक्रियेचा अवलंब करावा लागत आहे. श्री शिवसागर शुगर्स रामदुर्गच्या आवारात येत्या 16 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता लिलाव प्रक्रिया होणार आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!