चंदगड,आजरा,, भुदरगड, गडहिंग्लज , खानापुर व बेळगाव तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षीच्या सन 2022 च्या हंगामाची पुढील दिशा ठरविण्याकरता बैठक अडकुर येथील रवळनाथ मंदिर येथे येत्या रविवारी दिनांक 20 मार्च रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी निर्माण झालेल्या अडचणी व त्यावरील उपाययोजना करण्यासाठी मा. नितीन पाटील व आंदोलनातील प्रमुख मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न थेट केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी एक निश्चित धोरण या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. तरी सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन बळीराज काजू उत्पादक शेतकरी समुहातर्फे करण्यात येत आहे.
काजू उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षीच्या हंगामाची दिशा ठरवण्यासाठी अडकुर येथे रविवारी बैठक
Previous articleपदवीधरानो आपला मतदानाचा हक्क मिळवा!!
Next article२१, २२ मे रोजी शिक्षक भरती परीक्षा