हिंडलगा सुळगा येथील ठेकेदार संतोष पाटील यांच्यावर त्यांच्या बडस या गावी आज अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला.
संतोष यांच्या अंत्यविधीला काँग्रेसचा आमदार लक्ष्मी ताई हेब्बाळकर यादेखील उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी मयत संतोष यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी तसेच त्यांनी केलेल्या विकास कामांची बिले तात्काळ मंजूर करून द्यावी अशी मागणी अंत्यसंस्कार प्रसंगी केली.
तसेच बडस गावात आज तीन विवाह असल्याने ग्रामस्थांच्या विनंतीनुसार संतोष यांच्यावरील अंत्यसंस्कार लवकर उरकण्यात आला. यावेळी गावकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.