आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो. या उद्देशाने वन टच फाउंडेशन, फेसबुक फ्रेंड सर्कल आणि पृथ्वीसिंग फाउंडेशन च्या पुढाकाराने हिंडलगा सूळगा येथे असणाऱ्या हुलाप्पा निंगाप्पा उचगावकर या युवकाच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे.
आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने या तीनही फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.तसेच सदर कुटुंबीयांना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक आहार धान्य फळे याची मदत देऊ करण्यात आली आहे.
याप्रसंगी संतोष दरेकर पृथ्वीसिंग विठ्ठल पाटील जस्विर सिंग अवधूत तुडयेकर महादेव लाड कल्पना सावगावकर यांच्या हस्ते मदत वितरित करण्यात आली आहे. जर समाजामध्ये अशा आणखीन कोणत्याही व्यक्ती गरजू असल्यास त्यांना मदतीची गरज असल्यास त्यांनी 8884 64013 तीन किंवा 93 42 30 76 05 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.