शिवचित्ररथ मिरवणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त डॉक्टर बोरलिंगय्या यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी या निवेदनाचा स्वीकार पोलीस उपायुक्त डॉ रवींद्र गडादी यांनी केला .
या निवेदनात शिवजयंती चित्ररथ महामंडळाने आपल्या काही समस्यांविषयी सूचना देत मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्याकरिता निवेदन दिले आहे. दिनांक 4 मे रोजी बेळगावात काढण्यात येणारे शिवचित्ररथ मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी तसेच शिवचित्ररथ मिरवणुकीदरम्यान कोणतीही कोंडी होऊ नये याकरिता खबरदारी घेण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आहे.
यासह शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने या निवेदनात अनेक मागण्या केल्या आहेत. या निवेदनाचा स्वीकार आज पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांनी केला. याप्रसंगी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.