सामाजिक माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता आमदार अनिल बेनके यांनी उत्तर मतदार क्षेत्रातील प्रत्येक वर्गामध्ये महिलांकरिता मनोरंजनात्मक खेळाचा उपक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ कित्तूर राणी चन्नमा आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली.
सदर आई बापाची लाडाची लेक या खेळाच्या माध्यमातून महिलांसाठी शारीरिक व बौद्धिक खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात महिलांना रिंग खेळ बलून खेळ लिंबू चमचा कप खेळ यासारखे आणखी वेगवेगळे मनोरंजनात्मक खेळ खेळविले जाणार आहेत.
आमदार अनिल बेनके यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमात अंतर्गत खेळविण्यात आलेल्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धा चव्हाट गल्ली येथील जालगार मारुती मंगल कार्यालयात पार पडणार असून अधिक माहितीसाठी संगीता घाटकर 96 63 63 86 60 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.