रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने युनियन जिमखाना मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आज शनिवारी समारंभपूर्वक करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी साउथ चे अध्यक्ष अशोक नाईक सचिव संतोष हत्तरकी माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पोतदार जिल्हा स्पोर्ट्स इन्चार्ज महेश अनगोळकर स्पर्धा चेअरमन डॉक्टर मनोज सुतार सचिव वीरधवल उपाध्ये विक्रम जैन अनंत कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अशोक नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन केले तसेच क्रीडा स्पर्धेची माहिती डॉक्टर मनोज सुतार यांनी दिली यावेळी बॅडमिंटन कोर्से उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अविनाश पोतदार यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला
या क्रीडा उत्सवात क्रिकेट बॅडमिंटन कॅरम टेबल टेनिस बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात समावेश आहे. रविवारी या क्रीडा स्पर्धेची सांगता होणार आहे.