पदवीपूर्व महाविद्यालय आणि विद्यालयातील हिजाब बंदीच्या विरोधात आज ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी आणि महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी महिलांनी हिजाब जाब हमारा हक्क है लेके रहेंगे लेके रहेंगे आजादी लेके रहेंगे , वि वॉन्टेड जस्टीस या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचे रीतीरिवाज पाळण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुस्लीम मुलींना हिजाब परिधान करण्यावर बंदी आणली जाऊ नये या मागणीसाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. सध्या राज्यातील बऱ्याच पदवीपूर्व तसेच उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हीजाब तोंडावरील बुरखा परिधान करू नये असा नियम लागू करण्यात आला आहे त्यामुळे हा नियम लागू केला जाऊ नये याकरिता जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम संघटनेच्या महिला आणि पुरुष उपस्थित होते .