बेळगाव :हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिना निमित्त मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
१७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस मराठी माणूस कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. तसंच बाळासाहेब ठाकरे हे एखाद्या वलयाप्रमाणे आजही सीमाभागाच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये त्यांचं स्थान राखून आहेत. प्रारंभी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे या घोषणा देण्यात आल्या.
प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो ला हार घालून दोन मिनिटे मौन पाळून मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी यल्लाप्पा रेमाणाचे, महेश मरगानाचे,अजय यळूरकर,श्रीधर रेमानाचे,बसू पाटील,प्रशांत आकनोजी,गुंडू जायानाचे,सुनील मरगानाचे,तेजस पाटील,बजरंग मरगानाचे,मनोज रेमानाचे,बसवंत सांबरेकर,संजय रेमानाचे,अल्केश रेमानाचे,केतन पाटील, यल्लाप्पा देसाई,सतीश रेमानाचे,मारुती रेमानाचे,जोतिबा चौगुले,अनिल रेमानाचे,धनंजय रेमानाचे व गल्लीतील कार्यकर्ते उपस्थित होते..
ब्राम्हलिंग युवक मंडळ, ब्राम्हलिंग हट्टी धामणे. या मंडळाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट मा. श्री बाळासाहेब ठाकरे यांचा स्मुर्तीदिन साजरा
