No menu items!
Tuesday, July 1, 2025

राष्ट्रीय स्पर्धांसाठी यांची झाली निवड

Must read

स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या इमानी जाधव आणि परीका हेरेकर या जलतरणपटुंनी नुकत्याच पार पडलेल्या शालेय शिक्षण खात्याच्या (पदवी पूर्व) राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात चमकदार कामगिरी नोंदविल्यामुळे आता त्यांची राष्ट्रीय पातळीवरील शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.

शालेय शिक्षण खात्याच्या (पदवी पूर्व) राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव -2023 -24 मधील जलतरण स्पर्धा बेंगलोरच्या बसवनगुडी एक्वेटी सेंटर येथे नुकतीच पार पडल्या. या स्पर्धांमध्ये रवींद्रनाथ टागोर पीयू कॉलेज बेळगावची विद्यार्थिनी इमानी जाधव हिने 1 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य पदक, तर गोविंदराम सक्सेरिया सायन्स कॉलेज बेळगावची परीका हेरेकर हिने 1 रौप्य व 1 कांस्य पदक पटकाविले आहे. आपल्या या कामगिरीद्वारे इमानी जाधव आणि परीका हेरेकर यांनी आगामी राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांसाठी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. या दोन्ही जलतरणपटू केएलईएस सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल या ऑलम्पिक आकाराच्या जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर, गोवर्धन काकतकर व इमरान उचगांवकर यांचे मार्गदर्शन, तसेच आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कापाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे. राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल इमानी आणि परीका या दोघींचे त्यांच्या महाविद्यालयासह जलतरण क्षेत्रात अभिनंदन होत आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!