जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
नंदीहळली, बेळगाव: हिंदू धर्माचे पालन न केल्यामुळे समाज अधोगतीला गेला आहे आणि त्यामुळे तो जीवनातील आनंदापासून तो वंचित राहत आहे. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. आपल्याला योग्य साधना माहित नसल्यामुळे देवाचे अस्तित्व आपण अनुभवू शकत नाही त्यासाठी प्रत्येकांनी साधना समजून घेतली पाहिजे असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या नंदीहळली येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या व्याख्यानाच्या प्रसंगी बोलत होत्या. या व्याख्यानाचा लाभ नंदीहळली आणि आजूबाजूच्या गावातील 350 हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
सद्गुरु स्वाती खाडयेे यांनी दु:खाची कारणे, साधनेचे विविध मार्ग, कलियुगात योग्य साधना कोणती आहे आणि कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व इत्यादी विषयांवर मार्गदर्शन केले आणि साधना समजून घेण्यासाठी सनातन संस्थेच्या साप्ताहिक साधना सत्संग वर्गसाठी येण्याचे आव्हान केले.