शेतकऱ्यांना योग्य वेळेत थ्री फेज आणि सिंगल फेज वीज पुरवठा करावा, अशी मागणी गर्लगुंजी ग्रामस्थांच्यावतीने ग्रा. पं. सदस्यांनी एका निवेदनाद्वारे हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
शेतीच्या वीजपुरवठा संदर्भात गर्लगुंजी ग्रामस्थांच्यावतीने आज शुक्रवारी सकाळी हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंता कल्पना तिरविर याना सादर करण्यात आले. हेस्कॉमकडून थ्री फेज वीज पुरवठा पहाटे 4 वा. दिला जात आहे. मात्र त्यावेळी दिवसभर काम करून दमलेले शेतकरी साखर झोपेत असतात. परिणामी त्यावेळेत शेतातील बोअरवेलचे पाणी पिकांना देणे कठीण होते. त्यासाठी हा वीज पुरवठा दिवसा देण्याबरोबरच त्याचा कालावधीही वाढवून द्यावा. त्याच प्रमाणे खानापूर भागात जवळ जवळ 200 कमर्शिअल कनेक्शन्स विट व्यवसायासाठी घेतले जातात. तथापी सिंगल फेज वीज पुरवठा बंद असल्यामुळे लोकांनी कमर्शिअलसाठी भरलेले पैसे वाया जात आहेत. वीट उत्पादन रात्रीच्या वेळी केले जात असल्यामुळे सिंगल फेज वीज पुरवठा सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी हेस्कॉमकडून गर्लगुंजी गावातील विजेचे जीर्ण खांब काढून नवे खांब आणि वायर्स घालण्यात येत आहेत. फार दिवसाच्या प्रयत्नांनंतर हे काम होत असल्याबद्दल गावतर्फे अधिकाऱ्यांचेआभार मानण्यात आले. याप्रसंगी गर्लगुंजी ग्रा. पं. सदश प्रसाद पाटील, अजित पाटील, सुरेश मेलगे, सेक्रेटरी चौगुले, हेस्कॉम सेक्शन ऑफिसर जावेद नाईकवाडी, कल्लापा लोहार, संगापा कुंभार, पुंडलिक मेलगे, गणेश देसाई, यल्लपा कुंभार, ज्ञानेश्वर कुंभार, भुजंग कुंभार, संजय भातकांडे आणि इतर ग्रामस्थ उपस्थीत होते.