महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ईएसआयसीरुग्णालयांची कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत उभारणी केली जाणार असल्याची माहिती, केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानेदिली आहे.नवी दिल्ली येथे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री, भूपेंद्रयादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ईएसआयसीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावांना मंजूरीदेण्यात आली आहे.महाराष्ट्रातीलबिबवेवाडी (पुणे) येथे ईएसआयसी रुग्णालयातल्या खाटा शंभरवरून एकशे वीसवरनेण्याच्या प्रस्तावालाही मंजूरी देण्यात आल्याचे मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात उल्लेखआहे. तसेच, अंधेरीमध्ये पाचशे खाटांच्या बहुशाखीय रुग्णालयाला मंजूरी देण्यात आलीआहे. त्यात सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली मिळण्यास मदत होणार आहे.कायमचे अपंगत्व आल्यास मिळणारे लाभ, तसेच कर्मचाऱ्यांवरअवलंबून असणाऱ्यांना मिळणारे लाभ वाढविण्याविषयीही बैठकीत मंजूरी देण्यात आली.महाराष्ट्रराज्यासोबतच, गुजरातमध्ये सतरा ठिकाणी नवीन दवाखान्यांची उभारणीही केली जाणार आहे,तर, ओडिशातील राऊरकेलामधल्या रुग्णालयात खाटांची संख्या 75 वरूनदीडशेवर नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 217 /दि. 18. 12.2023
महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये नऊईएसआयसी रुग्णालयांची उभारणी केली जाणार
