लघु उद्योग भारतीच्या महिला उद्योजक शाखेतर्फे रोजगार खात्याच्या सहसंचालक साधना पोटे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी लघु उद्योग भारतीच्या सहकार्याने उद्योजकता, विकास आणि प्रशिक्षण देण्याची ग्वाही पोटे यांनी दिली. लघु उद्योगच्या राज्य सचिव प्रिया पुराणिक यांनी त्यांचे स्वागत केले. सचिव भोजराज यांनी लघु उद्योग भारतीची माहिती दिली.
छाया प्रभू, हेमा, विजयलक्ष्मी, शैलजा, भावना, वीणा यांनी साधना पोटे यांच्याशी संवाद साधला.



