प्रतीवर्षाप्रमाणे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा समावेश व स्नेहभोजन हा कार्यक्रम बेळगाव तालुक्यातील उचगाव गावांमधील श्री मळेकरणी देवस्थानच्या परिसरामध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला. यंदा या कार्यक्रमाचे 27 वे वर्षे होते, धनंजय जाधव मित्रपरिवार च्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
खानापूर तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष श्री संजय कुबल यांनी प्रास्ताविक भाषण केले, कर्नाटकाचे माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते श्री के एस ईश्वरप्पा म्हणाले की अयोध्या एक झाकी है काशी मथुरा बाकी नसून पूर्ण झाल्यासारखे आहे हिंदू समाज जागा झाला असून भारतातील जेवढी मंदिरे तोडून मशिदी बांधण्यात आले आहेत त्या मुस्लिम समाजाने हिंदूंना परत द्याव्यात नाहीतर फोडून काढून मंदिर बांधले जातील असे ते म्हणाले,
याप्रसंगी राज्य प्रवक्ता श्री हरिप्रकाश कोनमने म्हणाले की आपली हिंदू संस्कृती ही अतिशय पुरातन संस्कृती असून जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे, ही संस्कृती विज्ञानावर खरी उतरली आहे, हिंदुत्व हीच या देशाची आत्मा आणि ओळख आहे याच्या रक्षणासाठी आपण सर्वजण कटिबध्द राहिले पाहिजेत असे ते म्हणाले,
यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार श्री अभय पाटील म्हणाले यमकनमर्डी क्षेत्रातील वंटमुरी येथे एका महिलेला नग्न करून धिंड काढली जाते या प्रकरणाला कारणीभूत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला वाचविण्याचा प्रयत्न केला जातोय हा समस्त महिला वर्गाचा घोर अपमान आहे असे ते म्हणाले, याप्रसंगी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव म्हणाले, हिंदूने लाचारी सोडून देश आणि धर्मासाठी कार्य केले पाहिजे आम्ही कोण आहोत आपला इतिहास काय आहे याबाबत थोडे आचलन केले पाहिजेत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी औरंगजेब टिपू सुलतान यासारख्या धर्मांध मुस्लिम राजांना महान ठरविण्याचा खोटा इतिहास आम्हाला शिकवला ते महान होते तर शंभुराजे कोण होते? महाराणा प्रताप कोण होते? ,
मैसूरच्या जनतेवर झालेल्या अत्याचारांचा काय? असे ते म्हणाले.
याप्रसंगी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, गुंडू पाटील आदींची भाषणे झाली. याप्रसंगी व्यासपीठावर बेळगावच्या महापौर सौ शोभा सोमानाचे व उपमहापौर रेश्मा पाटील, प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई मलिकार्जून माद्दन्नावर, बसाप्पा चिकलदिनी, रवी कोकितकर, पंडित ओगले, बाळासाहेब देसाई, प्रदीप पाटील, राजू भातकांडे, क्षडाक्षरी हिरेमठ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज घाडी व सिद्धाप्पा हुक्केरी यांनी केले, आभार प्रदर्शन संतोष जैनोजी यांनी केले, कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता