खानापूर समितीचे आवाहन
आज खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक राजा शिवछत्रपती स्मारक येथे पार पडली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर समितीचे अध्यक्ष श्री.सूर्याजी सहदेव पाटील हे होते आजच्या बैठकीचा मुख्य उद्देश येत्या १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी आवाहन करणे हा होता, ६६ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे आणि आम्ही अजूनही भाषिक पारतंत्र्यात असून आम्हाला न्याय मिळालेला नाही, या अन्यायाविरुद्द लढतांना अनेकांनी प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करलेलं आहे त्यांचं स्मरण करून त्यांना येत्या १७ जानेवारीला अभिवादन करूया यासाठी समस्त जनतेने सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक खानापूर येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे, तसेच मी सुरुवाती पासूनच मध्यवर्ती समितीचा सदस्य असल्याने मध्यवर्ती समितीच्या प्रत्येक मोर्चे आंदोलनात सहभाग दर्शवू व हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही एकजुटीने लढूया, असे प्रतिपादन अध्यक्ष सूर्याजी पाटील यांनी केले, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले की, या लढ्याचं पाहिलं हुतात्म्य हुतात्मा नागाप्पा होसुरकर यांच्या रूपानं तालुक्यान दिलंय, हे रक्त वाया जाऊ दिल जाणार नाही, युवक आजही या सीमालढ्याशी निगडित असून ज्येष्ठांच योग्य मार्गदर्शन अपेक्षित आहे, खानापूर तालुक्यातील समस्त समिती प्रेमी, मराठी प्रेमी व युवकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे व तज्ञ कमिटीचे अध्यक्ष खा.धैर्यशील माने यांनी बेळगावात येऊन आवाहन केल्या प्रमाणे सिमावासीयांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असेही धनंजय पाटील यांनी म्हटले, तर सर्व अडचणींवर मात करून महाराष्ट्र शासनाच्या जीआर मध्ये बदल घडवून सिमावासीयांच्या जखमांवर फुंकर घालण्याचं काम या वैद्यकीय सहायता निधीतून करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारने केला आहे याचा लाभ सिमावासीय म्हणून खानापूर तालुक्यातील जनतेला मिळावा यासाठी धनंजय पाटील यांच्याशी ७८९९०९४१०८ (7899094108) या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन राजू पाटील यांनी केले, यावेळी पी.एच. पाटील. माजी सभापती सुरेश देसाई, बळीराम पाटील, रवी पाटील आदी उपस्थित होते.