महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी
करण्यात आली. स्वराज्य निर्माण योगदान दिलेल्या या थोर मातेस महिला आघाडी तर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला आघाडी च्या अध्यक्षा सौ रेणू किल्लेकर अध्यक्षस्थानी होत्या.आपल्या प भाषणात त्यांनी वरील मनोगत व्यक्त करत महिलांना देखील मार्गदर्शन केले माजी महापौर सौ सरिता पाटील यांनीही जिजाऊ ना अभिवादन केले.तसेच या प्रसंगी स्वामी विवेकानंद जयंती (युवा क्रांती दिन) निमित्त आहिला आघाडीच्या वतीने स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांनी अवलंब करावे असे आवाहन केले. महिला आघाडीच्या कार्यकर्त्या कांचन भातकांडे ,मंजुश्री कोलेकर, श्रद्धा मंडोळकर, अनुपमा कोकणे, माला जाधव, राजश्री बडमजी, कांचन बाबूळकर ,शामिनी पाटील ,आशा पाटील,कांचन येळ्ळूरकर, सुजाता बामुचे ,नकुशा, भाग्यश्री जाधव, सार्वला शिल्पा यकुनी, अनुसया पाटील,कुरणे ,सविता काकतकर, व इतर महिला वर्ग उपस्थित होता .या प्रसगी प्रिया कुडची यांनी आभार मानले
महिला आघाडीच्या वतीने जिजाऊ जयंती
