महिला विद्यालय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींचा कौतुक सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विनोद गायकवाड, शाळेची विद्यार्थिनी पंतप्रधान कु. संस्कृती गावडे शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर उपस्थित होते. सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत, शालागीत सादर केले. मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सरांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा परिचय करून दिला व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यािंनींनी आपल्या कलागुणांनी सजवलेले हस्तलिखित ‘ सखी ‘ याचे पाहुण्यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा. विनोद गायकवाड यांनी विनोदी हलके फुलके असे वातावरण निर्माण करुन विद्यार्थिनींना शिक्षणाचे मोल, गुरुजनांचा आदर, जीवन अनमोल आहे त्याला छान जगा असे सांगताना आयुष्यात प्रामाणिकपणा सचोटी याला कायम महत्व द्या असे सांगताना लोकमान्य टिळक महर्षी कर्वे यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले. मार्गदर्शन अतिशय सुंदर ओघवत्या शैलीमध्ये केले. वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. पारितोषिक वितरणाचे कार्य सहशिक्षिका श्रीमती अस्मिता देशपांडे व सौ. स्मिता कुलकर्णी यांनी पाहिले यावेळी एस. एस. एल. सी. 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत शाळेत प्रथम आल्याबद्दल शाळेच्या माजी शिक्षिका कै. वैजयंती आठवले यांच्या स्मरणार्थ श्री आदित्य राव यांनी दिलेला लॅपटॉप पारितोषिक म्हणून देऊन कु. साधना कल्लाप्पा धामणेकर हिला गौरवण्यात आले. तसेच विविध विषयांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनींना भरघोस पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यिनींना सुद्धा यावेळी बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्राथमिक विभागातून कु. रोहिणी सुनिल मालाई इ.7 वी हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून गौरवण्यात आले, तर माध्यमिक विभागातून कु. लावण्या परशराम सांबरेकर इ. 10 वी हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीचा मान मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सौ. नेहा भातकांडे तर आभार सहशिक्षिका श्रीमती माधुरी होनगेकर यांनी केले. कार्यक्रमाला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ पाटील यांचे लाभले, तसेच कार्यक्रम उत्तमरित्या पार पडण्यास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.