एका व्यक्तीने लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लोकायुक्त विभागाने आज बेळगावातील (डिस्टिक रजिस्टर ऑफिस) जिल्हा नोंदणी कार्यालयावर छापा टाकलाय आणि आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटर सोमशेखर मस्तमरडी याला रंगेहात पकडलंय
आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटर सोमशेखर मस्तमरडी याने २२ हजारांची लाच मागितली होती .त्यामुळे आज लाच घेताना लोकायुक्तांच्या जाळ्यात आउटसोर्स डेटा एन्ट्री ऑपरेटर सापडला
बेळगाव जिल्हा नोंदणी कार्यालयात कार्यरत असलेल्या सोमशेखर यांनी विक्रीचे चलन देण्यासाठी २२ हजारांची मागणी केली. अविनाश धामणेकर नावाच्या व्यक्तीने लाच घेतल्याची तक्रार लोकायुक्त ठाण्यात केली होती.त्यानंतर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज गुरुवारी दुपारी 12.30 वा.लोकायुक्त अधिकाऱ्यांनी नोंदणी कार्यालयावर धाड टाकून सोमशेखर मस्तमरडी याला रंगेहात 22 हजाराची लाच घेताना अटक केली. लोकायुक्त एस पी हनुमंत रायाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.