No menu items!
Monday, December 23, 2024

हेब्बाळकरांनी पुराव्या सहित खुलासा करावा -भाजप ग्रामीण ची मागणी

Must read

कर्नाटक मध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्या पासून ग्रामिंच्या सन्माननिय आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगांव ग्रामीण मतदारसंघासाठी कर्नाटक सरकार कडून कोणत्या योजनेतून कोणत्या कामासाठी किती अनुदान आणले याचा पुराव्यासहित खुलासा करावा या मागणीचे निवेदन देण्यासाठी भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळचे पदाधिकारी आज शनिवार दिनांक 10/02/2024 रोजी सह्याद्री नगर मधील निवासस्थान जवळील कार्यालयामध्ये
जाऊन आमदारांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांच्याकडे निवेदन दिले .

बीजेपी बेळगांव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यावेळी म्हणाले की
काँग्रेस सरकार आल्यापासून आतापर्यंत ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये कोण,कोणती कामे केली आहेत आणि कोण कोणत्या नवीन योजना राबवल्या आहेत आणि किती अनुदान आणले आहे याचा पुरावसहित खुलासा करावा

कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार सत्तेमध्ये यावे यासाठी काँग्रेस पक्षाने गॅरंटी वजा आश्वासने दिली . सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे सरकार दिवाळे काढण्याच्या वाटेवर आहे त्यामुळे ग्रामीण आमदारानी गेल्या दहा महिन्यांमध्ये किती फंड आणला आणि कोणत्या कामासाठी अशी मागणी त्यांनी केली.

याप्रसंगी घोषणा प्रती घोषणांनी वातावरण गरम झाले होते पोलिस प्रशासनानी चोख बंदोबस्त ठेवला होता.
या प्रसंगी भाजपा बेळगांव ग्रामीण मंडळ
अध्यक्ष धनंजय जाधव, प्रदीप पाटील, लिंगराज हिरेमठ, विठ्ठल कल्लानावर, प्रसाद बाचीकर, षड्याकषश्री हिरेमठ, गुणवंत सुतार,चंद्रशेखर वकुंद, विलास तशिलदार, गणपतराव देसाई, गुरू हलगती, राजू खानगावकर, आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!