स्वागताध्यक्ष :शिवसंत संजय मोरे
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित ‘ ५वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन -2024 ‘ रविवार दि .18 फेब्रुवरी 2024 रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आले आहे. बैठकिच्या अध्यक्षस्थानी परिषदचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण होते .
यावेळी साहित्यिक निवड करण्याकरिता बैठक नुकतीच डी.बी.पाटील फोटो स्टुडिओत घेण्यात आली. हे संमेलन तीन सत्रांत संपन्न होणार आहे.
यावेळी ५ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून जेष्ठ साहित्यिक कृष्णात खोत भूषविणार आहेत . त्यांना सन् 2023 चा साहित्य अकादामीचा पुरस्कार मिळाला आहे . संमेलनाचे स्वागताध्यक्ष
म्हणून शिवसंत संजय मोरे असणार आहेत.
सदरहू हे संमेत्रन तिन सत्रांत होणार आहे . गोवावेस येथून ग्रंथदिंडी सुरुवात होईल . संमेलनाच्या उद्घाटन सत्रात डॉ सदानंद मोरे यांनी संपादित व दीर्घ प्रस्तावना असलेल्या ‘ शिवराजाभिषेक : भारतातील इतिहासातील असामान्य घटना ‘या पुस्तकाचे प्रकाशन
तसेच गीताकर सीमाकवी रवींद्र पाटील आणि शरद गोरे यांनी संगीतबद्ध असलेले सुप्रसिद्ध पार्श्वगायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी स्वरबद्ध केलेले गीत ‘अखंड महाराष्ट्राचा लढा ‘ या ध्वनिमुद्रीत गीताचा प्रकाशन सोहळा संपन्न होईल .
पहिल्या सत्रांत – अध्यक्षीय भाषण , दुसरे सत्र – व्याख्यान शिवराज्याभिषेक : भारताच्या इतिहासातील असामान्य घटना ‘ या विषयावर व्याख्याते -प्रा. गणेश राऊत यांचे व्याख्यान
आणि तिसऱ्या सत्रात – कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ प्रस्तूत ‘ महाराष्ट्राची लोकधारा ‘ हा लोककलेतून प्रबोधन व मनोरंजन ‘ असा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे . अशी माहिती राज्याध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिली .
यावेळी परिषदेचे उपाध्यक्ष डी. बी. पाटील , संजय मोरे , रणजित चौगुले ,संजय गुरव , गणेश दड्डीकर , सुरज कणबरकर , एम.के. पाटील , संजय गौडाडकर तसचे महिला जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे पाटील , रोशणी हुंदरे , सुनिता बडमंजी , स्मिता किल्लेकर , डॉ. संजिवनी खंडागळे , स्मिता मेंडके , नेत्रा मेणसे व गीता घाडी उपस्थित होत्या .
सदर साहित्य संमेलन लोकवर्गणी होत असून दरवर्षी सढळ हस्ते देणगी देणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र संपन्न होणार आहे . संमेलन यशस्वी करण्याकरीता परिषदेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत .