जंगमहट्टी(ता.चंदगड) येथील ग्रामपंचायत कर्मचारी असणाऱ्या तानाजी शेळके यांच्यावर अस्वलाने हल्ला केला आहे. सकाळच्या सत्रात पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेळके यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला करत जखमी केले.
प्रसंगसावध होताच शेळके हे सुटका करून घेऊन बाजूला असणाऱ्या झाडावर चढले असल्याने फारसी दुखापत झाली नाही. मात्र अस्वलाच्या वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेळके हे सकाळी गावात पाणी सोडण्यासाठी गावच्या बाजूला( जंगल क्षेत्रात) जात असतात. आज ते सकाळी पाण्याचा हॉल चालू करत असताना अचानक त्यांच्यावर हा हल्ला झाला.शेळके यांना जास्त दुखापत झाली नसल्याची माहिती सरपंच विष्णू गावडे यांनी दिली आहे.