बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठवपटू संघटनेतर्फे (बीडीबीबीए) उद्या शनिवार दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता राज्य पातळीवरील मि. राॅ क्लासिक -2024 आणि 4थी मि. रॉ फिटनेस -2024 किताबाची भव्य शरीर सौष्ठव स्पर्धा छ. संभाजी उद्यान येथे आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय शरीर सौष्ठवपटू महासंघाच्या (आयबीबीएफ) आश्रयाखाली कर्नाटक राज्य शरीर सौष्ठवपटू संघटनेच्या (केएबीबी) सहकार्याने होणारी ही स्पर्धा 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो आणि 85 किलो वरील गट अशा आठ वजनी गटामध्ये घेतली जाणार आहे. सदर स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2500 व 2000 रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. मिस्टर राॅ क्लासिक किताब विजेत्यास 21,000 रुपये, उपविजेत्यास 11000 रु., सेकंड रनर्सअपला 7000 रु. आणि बेस्ट पोझरला 3000 रु. त्याचप्रमाणे आकर्षक करंडक, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र बक्षीसा दाखल दिले जाणार आहे. उद्या शनिवारी दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत छ. संभाजी उद्यान महाद्वार रोड येथे स्पर्धेच्या ठिकाणी वजन तपासले जाईल. स्पर्धेचे प्रवेश शुल्क 200 रुपये असून स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या हौशी शरीर सौष्ठवपटूंनी बीडीबीबीएचे अध्यक्ष गंगाधर एम. (9845857230), केएबीबीचे कार्यकारी अध्यक्ष अजित सिद्दण्णावर (9844063043), राष्ट्रीय पंच सुनील राऊत (9620407700), हेमंत हावळ (9448143610), विजय चौगुले (9964780696) अथवा बबन पोटे (7795628970) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.